Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अचानक साताऱ्यात उतरलं अन त्यानंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मागील महिन्यात धुळे शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्याचे विमान जळगावला उतरवावे लागले होते. पाऊस, धुक्यामुळे धुळे विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना जळगाव विमानतळावर उतरावे लागले होते. आता अशाच काहीशा प्रकार सातारा येथे घडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सातारा येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर अचानक साताऱ्यात उतरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

नक्की काय घडले?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी हेलिकॉप्टरने निघाले होते. मात्र खराब हवामानामुळे शिंदे यांचे हेलिकॉप्टर सातारा शहरातील सैनिक स्कुल येथे उतरवण्यात आले. मुख्यमंत्री यांचे साताऱ्यात अचानक आगमन झाल्याने प्रशासनाची यामुळे तारांबळ उडाली. आता येथून मुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वरमार्गे दरे या आपल्या गावी जाणार आहेत.