क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन; म्हणाले ‘तर देश 50 वर्षे मागे गेला असता’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आज महिला भगिनी सावित्रीबाईंच्यामुळेच मुख्य प्रवाहात तर आल्याचं परंतु आपले बांधव आहेत. त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमान, गौरव आहे. कारण इतिहासात प्रथमच भारतीय नौसेनेतील एका युद्ध नौकेचा नेतृत्व एक महिला भगिनी करत आहे. सावित्रीबाईंचे आपल्यावर डोंगराएवढे उपकार आहेत. त्यांचे कार्यही डोंगराएवढंच होत. त्याच मोजमाप करता येणार नाही. आपण जे सात जन्मात करू शकणार नाही त्यांनी एका जन्मात करून दाखवलं. आणि त्याच मार्गदर्शक म्हणून आपण आज ते स्वीकारतोय. सावित्रीबाई फुले नसत्या तर देश ५० वर्षे मागे गेला असता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. या सभागृहाच्या नूतनीकरणाअंतर्गत स्थापत्य कामांसाठी आणि विद्युतीकरणासाठी प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.