मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रतापगड संवर्धनासाठी पुढाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल प्रतापगड येथे दुर्ग मोहीम सांगता कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. महेश लांडगे, आ. नितेश राणे, संभाजी भिडे गुरुजी, उद्योजक भावेश भाटिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रायेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने या मंदिराला वेगळे महत्त्व आहे.

गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनाने प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी यावेळी केले