सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य शासनाची मान्यता, टेंभूबाबतही लवकरच निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह अनेक दुष्काळी गावातील पाणी प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला आहे. याचाच एक भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्पाला मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मान्यतेनंतर शिवसेना आमदार बाबर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरीसाठी आ. बाबर सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेरीस ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय जाहीर झाला. या शासन निर्णयाची प्रत आ. अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन घेतली. त्यावेळी ही प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी आ. बाबर यांच्याकडे प्रत सुपूर्द केली.

तसेच राज्य शासनाकडे दुसरी महत्त्वाची मागणी असलेल्या टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आ. बाबर यांना सांगितले. तसेच त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोघांच्यातील भेटीचा आणि प्रत देण्यात आल्याची पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02byhQxFn6NBuHi267vHvMCGtj4yY6jNUUK5MkgckiXcaDprp7GyNp5bHU6KSsv92cl&id=100044212400318&mibextid=Nif5oz

खानापूर, आटपाडी व तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चार तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार

सातारा जिल्ह्याला दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्वे चार तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे. यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनासुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी

खानापूर,आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.