सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी म्हणजेच दरे येथे दाखल झाले आहेत. काल दुपारी 2 वाजता शिंदे अचानकपणे आपल्या मूळगावी दाखल झाल्याने चर्चाना उधाण आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज साताऱ्यातील कराड तालुक्यात आहेत. भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत फडणवीस कराड येथे आले असून भाजपकडून भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानकपणे आपल्या मूळगावी आल्याने राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत.
एकनाथ शिंदे काल अचानक सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे येथे दाखल झाले. अचानकपणे मुख्यमंत्री आल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाली. अचानक मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर दरे येथील हेलिपॅड वर आल्यानंतर प्रोटोकॉल साठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली असल्याची दिसून आले . काल दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे दरे गावात आले.
एकनाथ शिंदे यांच्या आगमनानंतर नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार व उपस्थित असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचा अचानक दौऱ्याचा नेमकं कारण काय याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही मात्र नेहमीच लावा जमा घेऊन येणारे मुख्यमंत्रीकनाथ शिंदे यावेळी अचानक जिल्हा दौऱ्यावर आल्याने हा दौरा नेमका कशासाठी आहे नेमकं या दौऱ्या पाठीमागचं कारण काय आहे याबाबत अद्यापही कोणतीही पुष्टी मिळाली नाही.
फडणवीस कराड मध्ये-
दरम्यान, भाजपच्या वतीने महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असून देशभर मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविली जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराड दौऱ्यावर आहेत. आज म्हणजेच गुरुवारी सकाळी सकाळी १० वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने व्यापक चर्चा होणार आहे. तसेच यानंतर सकाळी ११ वाजता कराड येथील कल्याणी ग्राऊंडवर भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभा सुद्धा होणार आहे.