सातारा प्रतिनिधी | सातारा – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील खांबटकी घाटात आज शनिवारी दुपारच्या सुमारास एक आयशर ट्रकने अचानकपणे पेटल्याने मोठी खळबळ उडाली. काही क्षणात ट्रक भीषण आगीमध्ये जळून खाक झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंबाटकी घाटात आज दुपारच्या वेळी मुराद भैरवनाथ मंदिराच्या पुढे घाटातील वळणावर ट्रकने अचानक पेट घेतला. काही क्षणात संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. घटनेमुळे घाटातील महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.
https://www.facebook.com/share/v/1Ao9gpHDGJ
वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाड्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमधील आग पाण्याच्या साह्याने आटोक्यात आणली. काही वेळानंतर घाट मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.