ट्रक-आशयर टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे हा अपघात झाला. भरधाव कंटेनगर समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला धडकला. अपघात इतका भीषण होता, की कंटेनरने पेट घेतला. तर आशयरच्या समोरील भागाचा देखील चक्काचूर झाला.

या अपघातात कंटेनरमधील एकाचा घटनास्थळीच आगीत होरपळून मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.