कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत लोटस फर्निचरच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. मंगळवारी दूपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली. यामध्ये आयशर व कारचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकजण किरकोळ आहे.
याबाबत घटनास्थवरून मिळालेली माहिती अशी की, आयशर टेम्पो क्रमांक (KA 51 AH 0865) हा निघाला पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून निघाला असताना तो कराडनजीक मलकापूर हद्दीत लोटस फर्निचर परिसरात आला. यावेळी टेम्पोने रस्त्याच्या असलेल्या साईटला कठड्यास जोरात धडक दिली. यावेळी पाठीमागून एक कार क्रमांक (MH 09 GD 6900) हि टेम्पोखाली शिरली. त्यामध्ये कारमधील एक जण किरकोळ जखमी झाला.
आयशरला कारची जोरदार धडक; एकजण किरकोळ जखमी pic.twitter.com/WO9HWz6r0n
— santosh gurav (@santosh29590931) February 20, 2024
या धडकेत कारचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती कराड शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखा, महामार्ग देखभाल विभाग याला मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.या अपघातानंतर कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर, महाले सुनील कदम, डीपी जैन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी, दस्तगीर आगा तसेच नागरिकांनी घटनास्थळी मदत केली. यानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.