DYSP अमोल ठाकूर यांच्याकडून कराडच्या विसर्जनस्थळाची पाहणी; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । लाडक्या गणपती बाप्पाचे उद्या गुरुवारी अनंत चतुर्थीदिवशी विसर्जन केले जाणार असल्याने कराड शहरात पोलिस, पालिका प्रशासनाकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून सीसीटिव्ही कॅमेरेद्वारे घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवले जात आहे. या दरम्यान कराड येथील कृष्णा नदीपात्रालगत विसर्जनस्थळी आज दुपारी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विसर्जनस्थळाची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद सूर्यवंशी, पोलीस अधिकारी अजय गोरड, सरोजनी पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले, राजू डांगे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कराड येथील कृष्णा नदी पात्रालगत दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी कराड पालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून देखील लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान आज दुपारी कराडच्या डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी विसर्जनस्थळी भेट दिली.

यावेळी ते म्हणाले की, कराड येथील संपूर्ण गणेश विसर्जन मार्गाची पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर या दोघांनी पाहणी केलेली आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आज संपूर्ण विसर्जन मार्गाचीव पाहणी केलेली आहे. मिरवणूक सुरु होण्यापासून ते विसर्जन स्थळी येण्यापर्यंत असलेल्या मार्गाचा आढावा घेतला आहे. विसर्जनादम्यान कोणकोणत्या गोष्टी उदभवू शकतात आदी मुद्यांवर पालिकेस इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. उद्या कराड शहरातील नागरिकांकडून शांततेच्या मार्गाने गणपतीचे विसर्जन केले जाईल तसेच त्यांनी पोलीस प्रश्नासनाला सहकाय करावे, असे आवाहन करतो.

मिरवणूक मार्गावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच

विसर्जन मिरवणुकीदरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, चोरीच्या घटना घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याद्वारे शहरातील चौका-चौकात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाच्या घटनांवर लक्ष ठेवले जाणार आहे.