सातारा प्रतिनिधी | दिवाळीच्या सुट्या सुरू असलेल्या प्रत्येकाला या सणानिमित्ताने आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लागली आहे. हीच मनोकामना लालपरी पूर्ण करणार आहे. या काळात प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून विविध भागात जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. विविध भागात सरासरी ३१ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
सातारकरांचे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये जवळचे नाते आहे. या जिल्ह्यांचा रोटी-बेटीचा व्यवहार होत असते. तसेच शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने अनेकजण पुणे, मुंबईला स्थानिक झाले आहेत. दिवाळीत ही मंडळी आपल्या मूळ गावी येत असतात. सर्वच भावंडं, सुना, नातवंडे दिवाळी सण एकत्र साजरा करण्याची परंपरा अनेक कुटुंबांनी जपली आहे. किमान अभ्यंगस्नानाला तरी गावी जाण्याचा प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे एसटीला मोठी गर्दी होत असते.
हीच बाब हेरून विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी प्रवाशाची गैरसोय होणार नाही, असे नियोजन केले आहे. यासाठी विविध आगारांतून स्वारगेट, मुंबई सेंट्रल, बोरिवली, परेल, स्वारगेट, सोलापूर, आदी ठिकाणी जादा फेऱ्यांचे नियोजन अधिकारी ज्योती गायकवाड यांनी प्रवाशाची गैरसोय होणार नाही, असे नियोजन केले आहे. यासाठी विविध आगारांतून स्वारगेट, मुंबई सेंट्रल, बोरिवली, परेल, स्वारगेट, सोलापूर, आदी ठिकाणी जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.