सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे राज्य शासनाकडून दोन तालुके आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे.
गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली. प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा होता. दुष्काळी भागात चारा आणि पाणी टंचाईचेही संकट होते. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांसह राजकीय पक्षाकडूनही मागणी होत होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यातच राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले.
नोव्हेंबर महिन्यात शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा राज्यातील १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मान्यता दिलेली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलांचा समावेश करण्यात आलेला. राज्य शासनाने आता १६ फेब्रुवारीला राज्यातील नवीन काही महसूल मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. ज्या महसूल मंडलाचे विभाजन झाले. तसेच नवीन महसूल मंडल निर्माण झाले अशा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १२ मंडलांचा समावेश झालेला आहे.
सातारा तालुक्यातील करंजे तर्फ सातारा, कोडोली मंडल अंतर्भूत झाले आहे. तर कऱ्हाड तालुक्यातील येळगाव, पाटणमधील येराड, आवर्डे, मारुल हवेली. फलटणमधील कोळकी, खटाव तालुक्यातील कलेढोण, भोसरे तर माणमधील वरकुटे मलवडी, आंधळी आणि काेरेगावमधील साप मंडलाचा समावेश आहे. या ठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत.
पूर्वी जाहीर झालेली एकूण 65 महसूल मंडले
सातारा तालुक्यातील सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, वडूथ, तासगाव, अपशिंगे. जावळी तालुक्यातील आनेवाडी, कुडाळ. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मल्हारपेठ, तळमावले, कुठरे, मरळी. कराड तालुक्यातील कराड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, सैदापूर, शेणोली, कोळे, उंडाळे, काले, मलकापूर. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड, किण्हई. खटाव तालुक्यातील खटाव, औंध, पुसेगाव, बुध, वडूज, पुसेसावळी, मायणी, निमसाेड, कातरखटाव. माण तालुक्यातील दहिवडी, मलवडी, कुकुडवाड, म्हसवड, मार्डी, शिंगणापूर. फलटण तालुक्यातील फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की बुद्रुक, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव हि गवई महसूल मंडले म्हणून घोषित झालेली आहेत.