सातारा प्रतिनिधी | वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करण्याचा नुकताच निर्णय शासनाने घेतला आहे. तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्याचा गणवेश घालून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी समक्ष निवेदन स्वीकारावे, असा आग्रह धरला यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.
यावेळी साताऱ्यात करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनात रिपाइंनचे तालुकाध्यक्ष अप्पा तुपे, महिला जिल्हाध्यक्षा बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्याचा गणवेश घालून त्यांच्यासारखे उड्या मारत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा साताऱ्यात झाली.
शालेय गणवेश घालून RPI कार्यकर्त्यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन… pic.twitter.com/KTz4sDO4Yi
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 3, 2023
निवेदनात म्हटले आहे की, आई-वडिलांनंतर दुसरे मातृत्व म्हणजे शिक्षण आहे. हे शिक्षण दत्तक घेण्याच्या अर्थात विकण्याच्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला आहे हा निर्णय संविधान विरोधी असून सर्व सामान्य वंचित मुलांना क्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे सरकारी शाळा चालवण्याची पात्रता राज्य सरकारची नाही तर मग सरकारला काय उपयोग हे मातृत्व अबाधित ठेवण्यासाठी सरकारने संविधान विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.