साताऱ्यात घरामध्ये शिरले ड्रेनेजचे पाणी; रहिवाशांवर स्थलांतर करण्याची वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यामध्ये रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढलयामुळे कण्हेर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला. रविवारी दिवस रात्रभर जोरदार सरी कोसळल्यामुले ठीक ठिकाणी रस्ते खचले, छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, साताऱ्यात समर्थ मंदिर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी तसेच ड्रेनेज फुल्ल झाल्याने त्याचे दुर्गंधीयुक्त पाणी शिरल्याने रहिवाशांवर स्थलांतर करण्याची वेळ आली. सातारा शहरातील नागरिकांना अशा प्रकारे ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत असल्याने या प्रश्नाकडे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील श्रीराम अपार्टमेंट येथे राहता असलेल्या राजाराम शिंदे आपल्या कुटुंबासह यांच्या घरामध्ये शेजारील ड्रेनेज चॉकअप होऊन पाणी शिरले. यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबीयांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केले. शिंदे यांच्या घराशेजारील ही इतर चार खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. शिंदे यांच्याकडून अनेकवेळा ड्रेनेजच्या पाण्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करून पावसाळ्यात ड्रेनेजची समस्येवर उपाय करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.

दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून वारंवार हेलपाटे मारून देखील नगरपालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. अचानक ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने संतप्त झालेल्या शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी ड्रेनेज तुंबून पाणी आले त्याठिकाणी भेट दिली. तसेच तपासणी केल्यानंतर शिंदे यांच्यासोबत चर्चा देखील केलीय. मात्र, शिंदे यांच्या घरात शिरलेले पाणी हे दरेनेजचे नसून ते पावसाचे असल्याचे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

ड्रेनेजच्या साफ सफाईकडे पालिकेकडून दुर्लक्ष : राजाराम शिंदे

पावसाळयात पाणी ड्रेनेजमध्ये जारे. मात्र, ड्रेनेजमध्ये कचरा अडकल्याने ते तुंबले आणि त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी आमच्या घरात शिरले. मुसळधार पावसामध्ये अचानक दुर्गंधीचे पाणी घरात शिरल्याने आमच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना ड्रेनेजची पाण्याबाबत तक्रारी करून देखील त्याच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याची प्रतिक्रिया राजाराम शिंदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

पालिका कर्मचारी म्हणे घरात शिरलेले पावसाचे ड्रेनेजचे नाही

साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातील श्रीराम अपार्टमेंटमधील राजाराम शिंदे यांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरल्यानंतर त्यांनी तत्काळ पालिका अधिकारी व अधिकाऱ्यांना फोन लावला आणि पाण्यासंदर्भात तक्रार केली. मात्र, अधिकारी, कर्मचारी तासाभरातर घटनास्थळी दाखल झाले. ते घरात येताच शिंदे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेनेजचे पाणी दाखवले. सर्वकाही पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जे पाणी घरत शिरले आहे ते ड्रेनेजचे नसून पावसाचे असल्याचे सांगितल्याची माहित शिंदे यांनी दिली.