कराड प्रतिनिधी | 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत कराड तालुक्यातील प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. 9 डिसेंबर पर्यंत मतदारांना यावर दावे व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. दाखल हरकतींचे निरगमण केल्यानंतर निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानवेरी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांत अतुल म्ह्sत्रे व तहसिलदार विजय पवार यांनी दिली.
निवडणुक विभाग, संजयगांधी निराधार योजना व पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक शुक्रवारी तहसिदार कार्यालयात पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रांत अतुल म्हेत्रे व तहसिलदार विजय पवार यांनी माहिती दिली. यावेळी निवडणुक विभागाचे युवराज पाटील, पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार धुमाळ, तडवी उपस्थित होते.
यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे म्हणाले, निवडणुक विभागाच्या आदेशानुसार सध्या मतदार याद्यां अध्यावत करण्याचे काम सुरू आहे. नविन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरीत व दुबार मतदारांची नावे कमी करणे, चुकीचे काम, फोटो, पत्ता आदी बदल करणे आदी कामे निवडणुक विभागाच्या वतीने सुरू आहेत.
कराडच्या निवडणुक विभागाने अत्यंत चांगले काम केले आहे. जस्तीत जास्त युवा मतदारांची नावे नोंदवण्यासाठी कराड तालुक्यातील 40 महाविद्यालयात विषेश शिबिरे व जनजागृती करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळपास 2 हजार 900 युवकांचे नावे मतदार यादीत नोंदवण्यात आली आहेत. तर आजून सुमारे 7 हजार युवकांची नावे नोंदवण्याचे उद्धीष्ठ आहे.
यासाठी 4, 5 व 25, 26 नोहेंबर रोजी विषेश नोंदणी शिबिरे आयोजीत करण्यात येणार आहेत. या मोहिमेआंतर्गत कराड दक्षिण व उत्तर मतदार संघातील सुमारे 5 हजार 300 मयत मतदारांची नावे कमी करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अतुल म्हेत्रे व तहसिलदार विजय पवार यांनी दिली.
दिवाळीपुर्वी आनंदाचा शिधा मिळणार…
शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातुन लाभार्थांना दिवाळी सणाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये साखर, पामतेल व चणाडाळ प्रत्येकी 1 किलो. तसेच रवा, पोहा व मैदा प्रत्येकी अर्धा किलो असे साहीत्य मिळणार आहे. यासाठी लाभार्थांना 100 रूपये द्यावे लागणार आहेत. कराडच्या पुरवठा विभागाकडे किटचे सर्व साहीत्य उपलब्द झाले आहे. तर शुक्रवार पासून तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना किट पोहच करण्यात येत आहे. कुठल्याही परीस्थीतीत 8 नोहेंबर पर्यंत तालुक्यातील सर्व लाभार्थांना किटचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसिलदार विजय पवार यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थांना 4 कोटींचे वाटप
कराड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आदी योजने आंतर्गंत एकुण 10 हजार 779 लाभार्थी आहेत. निधी अभावी जुलै महिन्यांपासून या लाभार्थांची पेन्शन रखडली होती. मात्र निधी उपलब्द होताच सर्व लाभार्थांच्या खात्यात पैसे जम करण्यात आले आहेत. पुर्वी सरासरी एक हजार रूपये मिळत होते. मात्र शासनाच्या निर्णयानुसार जुलै महिन्यांपासून दिड हजार रूपये करण्यात आले आहेत. त्यामुळे तिन महिन्याचे फरकासह सर्व पैसे लाभार्थांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजने आंतर्गत तालुक्यातील लाभार्थांना 4 कोटी 81 हजार 600 रूपये वितरीत करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.