सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार; RPI गवई गटाच्या डॉ. राजेंद्र गवईंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात आरपीआय गवई गटाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी नुकतीच केली.

कोरेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी मेळाव्यात बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना तुतारी चिन्हावर ३७ हजार मते मिळाले. वास्तविक आमचा एबी फॉर्म शिक्का नसल्याने रिजेक्ट झाला. अन्यथा हीच मते ७४ हजारापर्यंत गेली असती.

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे. तसेच महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात उमेदवार उभे करून पाच लाख मते घेणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी निर्धार मेळाव्यात व्यक्त केला आहे.

कोरेगाव विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर

मेळाव्यात डॉ. गवई यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोरेगाव विधानसभा मतदार संघासाठी चंद्रकांत कांबळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत मेळाव्यातून विरोधकांना इशारा दिला आहे. आम्ही जातीयवादी शक्तीसोबत नाही. आम्हाला जर दुर्लक्षित केले तर आमचे अस्तित्व दाखवावे लागेल,असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.