राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराची प्रयोगशाळा होय : प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

0
218
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत लवंडमाची यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराची प्रयोगशाळा होय. सुसंस्कारित सक्षम पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हीच पहिली संजीवनी असल्याचे प्रतिपादन आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले.

यावेळी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, 100 ग्रंथ सलग वाचून देखील जितके ज्ञान मिळणार नाही. तितके ज्ञान सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मिळते. त्यांची प्रतिभा शक्ती जागी होते. त्यांना प्रेरणा मिळते. कोणत्याही श्रमाची लाज वाटत नाही. सर्वांगिण विकासास चालना मिळते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजने मुळेच अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती उच्चपदस्थ झाल्या आहेत. कारण समाजाची बांधिलकी या शिबिरामध्ये जोपासली जाते. आज या आपल्या महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी ग्रामविकासाची अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण केली व ग्रामपंचायतीने ही उत्तम सहकार्य केलेले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे म्हणाले की, गेल्या सात दिवसात मुलांना जे मिळाले ते सोन्याहून पिवळे आहे. भविष्याचा पाया यानिमित्ताने तयार झाला आहे. कालपर्यंत या विद्यार्थ्यांना बऱ्याच बाबी माहीत नव्हत्या. या शिबिरामुळे माहित झाल्या. जबाबदारीची जाणीव निर्माण झाली घरापासून दूर कसे जगायचे याचे प्रत्यक्ष ज्ञान या शिबिरामुळे प्राप्त झाले आहे. नक्कीच हे शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी गावाचा राज्याचा आणि देशाचा सर्वागीण विकास करण्याचा प्रयत्न करतील. अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. समारंभाचे विशेष उपस्थिती म्हणून रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ‌. छाया दुर्गावळे यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केले. समारंभाचे स्वागत अध्यक्ष उपसरपंच मा.उत्तम डिसले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सरपंच विजयराव दुर्गावळे होते‌. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे तिसरे विशेष श्रमसंस्कार शिबिर आमच्या गावात पूर्ण केले. ग्राम विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची दिशा दिली. त्याबद्दल गावाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करतो व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो! ग्रामपंचायत सदस्य रामदास सरोदे यांनीही सर्व स्वयंसेवक-
स्वयंसेविकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच संदीप डिसले, राजकुमार दुर्गावळे, मा.दिलीप डिसले, दिलीप पिसाळ, जयवंत जाधव मा. सचिन साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता जाधव, सुजाता पिसाळ, अनुपमा कुंभार, मोनाली माळी,पोलीस पाटील संतोष सोनुलकर, युगंधर डिसले व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मिनी पवार उपस्थित होते‌. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. पांडुरंग कणसे, शिवाजी पाटील, विशाल दुर्गावळे, नागेश थोरात, प्रसाद दबडे, भीमराव दबडे, विकास माळी, इत्यादी ग्रामस्थ बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.रघुनाथ गवळी यांनी केले‌. प्रा.अण्णासाहेब पाटील यांनी अहवाल वाचन केले. अहवाल वाचन शिबिरास सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे सत्कार नियोजन प्रा. डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. आभार प्रा. विश्‍वनाथ सुतार यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड व प्रा. दिपाली वाघमारे यांनी केले. प्रा. विनायक जाधव, प्रा.जयदीप चव्हाण, प्रा.प्रवीण देशमुख, प्रा.अरविंद मोहिते यांनी नियोजनासाठी सहकार्य केले. तसेच सात दिवसाच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी आदरणीय तुकाराम तात्या कदम व पंकज कुंभार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.