टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? : डाॅ. भारत पाटणकरांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. टेंभू उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली तरी देखील भूसंपादन होऊन काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. 2020 पासून भूसंपादन प्रक्रिया थेट खरेदी पद्धतीने राबवली जात आहे. मात्र, ही पद्धत संथ गतीने सुरू आहे. टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्यावर अन्याय का केला जातोय? त्यांना का न्याय दिला जात नाही. केव्हा न्याय मिळणार? असा सवाल डॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला.

कराड येथे पर पडलेल्या बैठकीस डॉ. भारत पाटणकर, कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, नायब तहसिलदार विजय माने, उपअभियंता श्री. पवार, प्रशासकीय अधिकारी, तसेच सुपने, पश्चिम सुपने, किरपे, येरवळे, मलकापूर येथील प्रकल्प बाधीत शेतकरी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले की, आज पार पडलेल्या बैठकीनंतर आता दि.17 ऑक्टोबर रोजीपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत प्रशासनास देण्यात येत आहे. जर प्रशासनाने दिलेल्या मूदतीपर्यंत मागण्या पूर्ण नाही केल्या तर शेतकऱ्यांचे वतीने मोठे आंदोलन केले जाईल. यावेळी शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने डॉ. पाटणकर व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार मानले. यावेळी पर पडलेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.