कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील जिंती येथे कराड दक्षिण डोंगरी विभागातील शेतकऱ्यांच्या वतीने श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठकी घेण्यात आली. या बैठकीत “कराड दक्षिणच्या डोंगरी विभागाला बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सर्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेचे काम पूर्ण होऊन योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळेल,” अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.
यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक उदय पाटील, मनवचे सरपंच पांडुरंग डांगे, भुरभुशीचे तानाजी पाटील, तुकाराम पाटील, धनाजीराव पाटील, शहाजी शेवाळे, जिंतीच्या सरपंच पाटील, माजी सरपंच तानाजी पाटील, अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले की, वाकूर्डे बुद्रुक योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळावे, यासाठी लागणाऱ्या सर्वेसाठी निधी मंजूर जिंती झाला आहे. येत्या दोन महिन्यात सर्वेचे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कराड दक्षिण विभागाला वारणा धरणाचे पाणी बंद पाईपलाईन द्वारे पाणी दिले तर सर्व गावांना आठ महिने नव्हे तर बारमाही पाणी तेही मुबलक मिळेल. या पाण्यामुळे या विभागातील शेतक-यांची आर्थिक प्रगती होऊन उत्पन्नात भरीव वाढ होईल, या विभागाचा कायापालट होईल यासाठी बंद पाईपलाईनद्वारे या विभागाला पाणी मिळावे म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण लढा उभा केला त्यास निश्चितपणे यश मिळेल.
पांडुरंग डांगे म्हणाले, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विभागाचा सव्हें करण्याची पहिली मागणी भारत – पाटणकर यांनी पाटबंधारे व कृष्णा – खोरे विभागाकडे केली. त्यानंतर – प्रशासनाने आपणास सव्र्व्हेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची – आपण मागणी केली. निधी उपलब्ध करून न दिल्यास कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. पण प्रशासनाच्यावतीने सर्वेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची लेखी पत्र आपणास दिले होते. सर्वेनंतर वा विभागाला बंद पाईपलाईन मधून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निधी लागणार असून तो निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी राजकारणविरहित संघटितपणे भारत पाटणकर यांच्याबरोबर राहिले पाहिजे आणि वेळ आला तर आपणाला संघर्ष करावा लागेल. या संघर्षाची तयारी या विभागातील शेतकऱ्यांनी ठेवावी असेही सांगितले.
उदय पाटील म्हणाले, डॉ. पाटणकर यांनी आपल्याला लढण्यासाठी प्रवृत्त केले आहे. त्यांच्या लढ्याने दुष्काळी तालुके समृद्ध झाली आहेत. कराड डोंगरी भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आल्यास आपल्या विभागातील या शेतकरी समृद्ध होईल. यावेळी तानाजी पाटील भूरभूशीकर, मीनारायण अॅडे यांनी मनोगते व्यक्त केली. आबासाहेब शेवाळे, श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते सखाराम पाटील, पाचगणीचे सरपंच संदीप पाटील, मानेवाडी सरपंच सचिन मोरे यासह जिती विभागातील शेतकरी, महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी आभार मानले