कराड प्रतिनिधी | राज्यात अनेक नवनवीन उद्योगधंदे यायला इच्छूक आहेत. त्यामुळे या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी राज्यात स्वतंत्रपणे ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ सुरु करण्याची आवश्यकता असल्याची आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. डॉ. भोसले यांनी केलेल्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्कता दर्शविली आहे. गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर बोलताना आमदार डॉ. भोसले यांनी माहिती दिली.
यावेळी आमदार डॉ. भोसले म्हणाले, कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी स्वतंत्र ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. या विभागात कामगार मंत्रालयाचे सचिव, कौशल्य विकास विभागाचे सचिव, काही लोकप्रतिनिधी आणि उद्योग जगतातील काही मंडळींचा समावेश असावा. हणमंतराव गायकवाड यांनी बीव्हीजीसारखा मोठा उद्योग निर्माण करुन हजारो हातांना काम मिळवून दिले आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. आपण नेहमी बेरोजगारीवर चर्चा करतो. पण जर अशा पद्धतीचा विभाग विकसित केला, तर कुशल मनुष्यबळाची निर्मिती करता येईल. त्यामुळे मी मुख्यमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी या विभागाची लवकरात लवकर आपण स्थापना करावी. हा विभाग स्थापन झाल्यास राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या बाबतीत एक चांगले प्रगतीचे पाऊल ठरु शकले.
मिनी एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले
ऑटोनेक्स्ट नावाची कंपनी मला भेटली आहे. त्यांनी विनंती केली की ईव्ही व्हेइकल करण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. याबाबत मी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण ईव्ही हब करण्यासाठी थोडी जास्त जागा लागते. त्यामुळे मिनी एमआयडीसी मोठ्या तालुक्यांमध्ये करता येतात का ? यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे देखील यावेळी आमदार अतुलबाबा भोसले यांनी म्हटले.
दहा लाख तरुणांना प्रशिक्षण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानाच्या माध्यमातून १ लाख ३२ हजार तरुणांना प्रशिक्षित करण्याचे काम आजपर्यंत केलेले आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारचा मानस आहे की १० लाख तरुणांना यावर्षी चालू आहे. त्या महामार्गामुळे १२ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. नागपूरपासून गोव्यापर्यंत महत्वाची ठिकाणे जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि त्याचा देखील फायदा निश्चित स्वरूप होणार असल्याचे आमदार अतुलबाबांनी सांगितले आहे.