सहलीच्या एसटीला अपघात झाल्यास काळजी नको; एका फोनवर मिळेल तत्काळ मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा, हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, फेसाळणारे धबधबे, कास, बामणोलीतील अथांग पाणी अन् त्यात होणारी बोटिंग आदींचा अनुभव घेण्यासाठी शालेय सहली लवकरच सुरू होत आहेत. यासाठी एसटीचा वापर केला जातो. सहलीच्या एसटीला अपघात झाला तर दुसरी लगेच मिळते; पण सहलीच्या ठिकाणी घात-अपघात टाळण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. या ठिकाणी राज्य परिवहन विभागाकडून तत्काळमदत हि पोहचवली जाते.

एसटीचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित म्हणून ओळखला जातो. कारण एसटीचे राज्यातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यात कार्यालये आहेत. त्यामुळे वाहनाला जरा काही घडले तरी चिंता करण्याची आवश्यकता नसते. काही वेळेत संबंधित जिल्ह्यातील एसटीतील अधिकारी जबाबदारी घेऊन पर्यायी गाडी दिली जाते. त्यामुळे मुलांसह शिक्षकांचा वेळ वाया जात नाही. मुलं पुढच्या सहलीला जातात. या वेळेत ही गाडी दुरुस्त करून ती पुढील प्रवासाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना जाऊन मिळते. त्यामुळे सहलीचा आनंद कमी होत नाही.

विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी ५० टक्के सवलत

विद्यार्थ्यांना जीवनात निसर्गाच्या सान्निध्यात जाता यावे, विविध विभागांतील माणसांचे जनजीवन अनुभवता यावे, यासाठी सहली महत्त्वाच्या असतात; मात्र पैशांअभावी मुलांना अडचण येऊ नये म्हणून सहलीसाठी प्रासंगिक करार म्हणून एसटी मिळते. त्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते.

सहलीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी

पालकांचे संमतीपत्र :

१) सहलीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे, इयत्ता, त्यांचे आधारकार्ड क्रमांकाची यादी.

२) त्याचप्रमाणे पालकांची मुलाला किंवा मुलीला सहलीसाठी पाठविण्यास तयार असल्याचे पत्र.

३) कोणत्याही शाळेला सहल काढायची असेल तर शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी संबंधित शाळेने घेतलेली असणे आवश्यक आहे. संबंधित पत्र एसटीला जोडावे लागते.

ट्रॅव्हल्सने सहल नेण्याचे धोके

खासगी प्रवासी वाहनाचा वापर केल्यास चालक प्रशिक्षित असतीलच याची खात्री नसते. अपघाताचा धोका असतो. अडचणीच्या वेळी पर्यायी २ वाहनासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात.

एसटीची पावती घेणे महत्त्वाचे

राज्य परिवहन महामंडळाची एसटी सहलीसाठी घेणार असेल तर पन्नास टक्के पैसे भरले असल्याबाबत पावती घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असते.

मुख्याध्यापकांची जबाबदारी जास्त चांगले शिक्षक देणे

  • सहलीच्या ठिकाणी मुलं दंगा, मस्ती करण्याची शक्यता असते.
  • अशावेळी मुला-मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी चांगले शिक्षक देण्याची
  • जबाबदारी मुख्याध्यापकाची असते. अन्यथा अनर्थ घडू शकतो.