जिल्ह्यातील 8 तालुके ‘डोंगरी’च्या पूर्ण तर 3 तालुक्यांचा उपगटात समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील अनेक गावांचा नव्याने डोंगरी विभागात समावेश केला आहे. शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या शासन निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात आला आहे. तर जिह्यातील आठ तालुक्यांचा पूर्णगटात आणि तीन तालुक्यांचा उपगटात समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव व खंडाळा या तालुक्यांचा समावेश पूर्णगट डोंगरी तालुक्यात आहे. तीन तालुक्यांचा उप गटात समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ उपसमितीची दि. १३ जून २०२३ रोजी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयानुसार डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सध्या समाविष्ट असलेल्या पूर्णगट, उपगट तालुक्यांसोबत नव्याने काही तालुक्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने राज्यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीनुसार विशिष्ट निकषांच्या आधारे निश्चित करण्यात आले आहे.

‘पूर्णगट डोंगरी तालुका’ आणि ‘उपगट डोंगरी तालुका’ म्हणजे काय?

‘पूर्णगट डोंगरी तालुका’ आणि ‘उपगट डोंगरी तालुका’ यांचा अर्थ हा क्षेत्रफळानुसार काढला जातो. एखाद्या तालुक्यात डोंगरी भागाचे क्षेत्रफळ तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तो तालुका ‘पूर्णगट डोंगरी तालुका’ म्हंटला जातो. तसेच डोंगरी भागाचे क्षेत्रफळ तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तो तालुका ‘उपगट डोंगरी तालुका’ समजण्यात येतो.

डोंगरी तालुक्यातील लोकांना मिळतात ‘हे’ महत्वाचे फायदे

जिल्ह्यातील एखादा तालुका डोंगरी घोषित झाल्यानंतर त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना व लोकांना अनेक प्रकारे शासनाकडून फायदे मिळतात. यामध्ये खासकरून विद्यार्थ्यांना होय. विद्यार्थ्यांना महत्वाच्या शैक्षणिक सवलती मिळतात तसेच इतर योजनांच्या तुलनेत डोंगरी विकास निधीतून संबंधित तालुक्याला अतिरिक्त निधी मिळतो, तसेच प्रत्येक तालुक्याला दोन कोटींचा निधी या विकास योजनेतून शासनाकडून दिला जातो. डोंगरी तालुक्यातील मुलांना शिक्षणात दोन टक्के आरक्षण दिले जाते. त्यासाठी त्याच्याकडे डोंगरीचा दाखला असणे आवश्यक असते. विशेष म्हणजे पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनासाठी महापशू संजीवनी योजनेचा लाभ देखील घेता येतो.

कराड तालुक्यातील ‘या’ गावांचा उपगट डोंगरी विभागात समावेश

कराड तालुक्या या गावांचा उपगट डोंगरी विभागात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विंग, शेळकेवाडी (म्हासोली), हेळगाव, शहापूर, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी (उंडाळे), शेवाळेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (येणपे), कोरेगाव, शितळवाडी, चिखली, साळशिरंबे, कालगाव, भोळवाडी, येणके, म्होत्रे, येळगाव, पवारवाडी, पवारवाडी (नांदगाव), मनू, रिसवड, हणबरवाडी, आणे, कालवडे, टाळगाव, वहागाव, शामगाव, घोगाव, यशवंतनगर, पाडळी, सुलों, नांदलापूर, महारुगडेवाडी, जिंती, कामथी, टेंभू, घारेवाडी, हणमंतवाडी, जखिणवाडी, खालकरवाडी, गोपाळनगर, वराडे, वानवासमाची, येवती, घराळवाडी, नांदगाव, येणपे, आकाईचीवाडी, नवीन नांदगाव, वडगाव हवेली, चचेगाव, कासारशिरंबे, तांबवे, कुसूर, चोरमारवाडी, बाबरमाची, बेलदरे, शेणोली, शेवाळेवाडी (येवती), गोसावेवाडी, वाघेरी, वस्तीसाकुडों, वडोली निळेश्वर, भवानवाडी, अंतवडी, वसंतगड, साजूर, म्हसोली, तळबीड, तारूख, आबईचीवाडी, गोटेवाडी, तुळसण, गायकवाडवाडी, माटेकरवाडी, निगडी, गणेशवाडी, कोळे, साबळवाडी, साबळेनगर, साबळेवाडी, आंबेवाडी गावठाण ऑडोशी, लटकेवाडी, शिंदेवाडी, डफळवाडी, भुरभुशी, मांगवाडी, विजयनगर, शेळकेवाडी (यवती), चोरजवाडी, कोरीवळे, पाकुंद, शिंदेवाडी, नारायणवाडी, भरेवाडी, राजमाची, साखरवाडी, वानरवाडी, पाठरवाडी, मस्करवाडी, भगतवाडी, सवादे, हलेपवाडी, घोलपवाडी, खोडजाईवाडी, मसूर, वाण्याचीवाडी, कांबोरवाडी, शिरगाव, पाल, हरपळवाडी, आरेवाडी, गमेवाडी, पांढरवाडी, आने, वामनवाडी, उंडाळे, चरेगाव, वाघेरी, करवडी, हजारमाची, कावें, जखिणवाडी, घोगाव, माळवाडी व सयापूर या गावांचा समावेश आहे.