विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त 22 गावांमध्ये होणार कार्यक्रम : मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत संकल्प यात्रा पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर कालाधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व संकल्प यात्रा यशस्वी करणसाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केल्या. तर ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा गावांची प्राधान्याने निवड करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा प्रभावी राबविण्यासाठी जिल्हास्तरावर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, ही संकल्प यात्रेचे कार्यक्रम 11 तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये घ्यायचा आहेत.

हा कार्यक्रम 11 दिवसांचा असेल. प्रत्येक दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्रम घ्यावेत. मोठ्या गावांची व लोकसंख्या जास्त असलेल्या गावांची निवड करावी. कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात आरोग्य शिबीर, विविध दाखल्यांचे वाटप करावयाचे आहेत यासाठी लाभार्थ्यांची निवड करुन कागदपत्रांची पुर्तता आत्तापासूनच करावी.

विकसित भारत संकल्प यात्रेसाठी निवडण्यात येणारी गावे ही मोठी असावीत. या गावांनी कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. यात्रेच्या कार्यक्रमाची सुरुवात महाबळेश्वर, खंडाळा व वाई येथून होणार आहे. त्यामुळे येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी कार्यक्रमांची तयारी सुरु करावी. निवडलेल्या प्रत्येक गावात आरोग्य शिबीरे घ्यावयाची आहेत त्यामुळे ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा गावांची प्राधान्याने निवड करावी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केल्या.