Deputy CEO,HDO वर कारवाईची विभागीय आयुक्तांना सूचना, मंत्रालय कक्ष अधिकाऱ्याच्या पत्राने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती अर्चना वाघमळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचार तसेच आरोग्य विभागात गैरकारभार केल्याचा आरोप करत शशिकांत जाधव यांनी उपोषण केले होते. त्याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत खळखळ माजली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे यांच्या भ्रष्टाचाराबाबत उपोषण करत शशिकांत शिवाजी जाधव (तारळे, ता. पाटण) यांनी २४ नोव्हेंबर २३ व एक जून २०२४ व २१ जून २०२४ रोजी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये प्रती ग्रामसेवक पाच हजार रुपये व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून सात हजार रुपये दिवाळी व मार्च महिन्यात कलेक्शन गोळा केले. तसेच खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील अपहार व सरकारी सेवा केंद्राचे बनावट खोटे खाते उघडून घोटाळा केला आहे. सदर घोटाळा लपविण्यासाठी लॅपटॉप, मोबाईल जप्त करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जाधव यांनी केला होता. तसेच पंधरा दिवस ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या अनियमित व अनाधिकृत भ्रष्ट कारभाराबाबतही आरोप करण्यात आलेले आहेत. या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. याप्रकरणी मंत्रालय कक्ष अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना एका पत्राद्वारे कारवाईची सूचना केली आहे.