स्वच्छता ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी -विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | स्वच्छतेला जीवनामध्ये खूप महत्त्व असून संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने स्वच्छता जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, अमृत महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपायुक्त रामचंद्र शिंदे, राहूल साकोरे, विकास मुळीक आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, गाडगे महाराजांनी हजारो किलोमीटर पायी प्रवास करुन स्वच्छतेची चळवळ सुरु केली. त्या काळात त्यांनी स्वच्छतेचे महत्व गावोगावी पोहोचविले. आजही आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छतेला तेवढेच महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने परिसर स्वच्छतेला महत्त्व द्यावे. पुढील पिढीसाठी स्वच्छ, सुंदर वसुंधरा हवी असेल प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करणे गरजेचे आहे. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, शाळांनी मुलांच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष द्यावे. मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करणे गरजेचे आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने अनेक धोके निर्माण होणार आहेत.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेतील विजेत्या ग्रामपंचायती

बनवडी जि.सातारा-प्रथम, वाटंगी जि. कोल्हापूर व काळवाडी जि. पुणे विभागून द्वितीय, नांगोळे व खंबाळे जि. सांगली-तृतीय.