कराड प्रतिनिधी । जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा, न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेल्या प्रकरणांचा, अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींना देण्यात आलेल्या अर्थसहाय्य मंजूरी तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. तसेच याबाबत योग्य तोल निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.
सातारा येथील जिल्हाधिकार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी आढावा बैठकीत जिल्ह्यातील अनेक गोष्टीविषयी चर्चा केली. तसेच पोलीस विभागात प्रलंबित प्रकरणाची माहिती घेतली.
आढावा बैठकीदरम्यान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व संघटक व आरपीआय जावली अध्यक्ष यांनी महत्वाचे निवेदन दिले. उंब्रज पोलीस ठाण्यामधील पीडितांच्या पुनर्वसनाबाबत, मांडवे ता. सातारा येथील रमाई आवास घरकुल तसेच न्यू इरा स्कूल पांचगणी ता. महाबळेश्वर येथील अनूसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर जिल्हाधिकारी डुडी यांनी चर्चा केली. तसेच संबंधित प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रशासनास दिल्या.