गहू, तूर व उडीद अतिरिक्त साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार : जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध 31 मार्च 2024 पर्यंत तर तूर व उडीद डाळींच्या अतिरिक्त साठ्यावरील निर्बंध 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू केले आहेत. या अधिसुचनेपासून व्यापाऱ्यांना 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. मात्र, साठेबाजी केल्यास अशा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला.

सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजमाने म्हणाल्या की, कायदेशीर घटकांकडे असणारा गव्हाचा साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास तसे https://evegoils.nic.in/wsp/loging विभागाच्या या संकेतस्थळावर जाहिर करण्याचे आदेशित केले आहे. या अधिसुचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे.

कायदेशीर घटकांकडे असणारा डाळींचा साठा अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास, तसे fcainfoweb.nic.in या विभागाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या अधिसूचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत डाळींचा साठा कमी करणे आवश्यक राहील तसेच केंद्र शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले असल्याचे राजमाने यांनी सांगितले.