सातारा जिल्ह्यात 1 लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा वाटप : वैशाली राजमाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सर्व सामान्यांची दिपावली आनंदी व उत्साहात साजरी व्हावी यासाठी शासनामार्फत आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. हा शिधा रास्त भाव दूकानांच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचविला जात आहे. दिपावली सणानिमित्त सातारा जिल्ह्यात आनंदाचा शिधावाटप सुरु असून यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत 1 लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा सच वाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटपाबाबत राजमाने म्हणाल्या की, आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या संचांची टक्केवारी 33.68 टक्के आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात शिधा संचाचे वाटप करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा 10 हजार 196, कोरेगाव 17 हजार 111, कराड 38 हजार 232 वार्ड 9 हजार 157, सातारा 22 हजार 567, फलटण 13 हजार 422, जावली 5 हजार 175, महाबळेश्वर 1 हजार 500, माण 5 हजार 124, खटाव 6 हजार 92, पाटण 3 हजार 178. जिल्ह्यात अजून 2 लाख 60 हजार 795 आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. दिपावली पूर्वी हे वाटप पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाने नियोजन केले असल्याचे राजमाने यांनी सांगितले.