सातारा प्रतिनिधी | केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत येणाऱ्या माण तालुक्यातील 35 गावांचे व खटाव तालुक्यातील 31 गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी कॉलेज येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे.
दि. 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेमध्ये पाणी बचतीचे आधुनिक तंत्रज्ञान पिक नियोजनाचे मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यशाळेला माण व खटाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास आणि यंत्रणा कार्यालय सातारा वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश बेडसे व जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक शकील मुजावर यांनी केले.