वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; ‘इतक्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. हा पालखी सोहळा जिल्ह्यात दि. 23 जून कालावधी पर्यंत राहणार आहे. सातारा जिल्ह्यातुन पालखी सोहळ्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 666 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा काम पाहत आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे सातारा जिल्हयातून एकूण 66 किमीचा प्रवास असणार आहे. प्रथम दि. 18 जून रोजी सातारा जिल्हयात आगमन होऊन दि 18 व 19 जून असे दोन दिवस लोणंद ता. खंडाळा येथे मुक्काम, दि 20 जून रोजी तरडगांव ता. फलटण, 21 जून रोजी फलटण व दि 22 जून 2023 रोजी बरड ता. फलटण या ठिकाणी मुक्काम असणार आहे.

पाडेगाव ता. खंडाळा ते साधुबुवाचा ओढा ता फलटण या मार्गावर एकूण 1 उपजिल्हा रुग्णालय, फलटण व 4 प्राथमिक आरोग्य केंद्र येत असून त्या ठिकाणावरील सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

पालखी मार्गावरील वारकरी यांना आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य अधिकारी 1, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 2, तालुका आरोग्य अधिकारी 2, अति संचालक कु 1, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी प्रत्येकी 1 विस्तार अधिकारी – 2 व इतर कर्मचारी B. तालुकास्तावरील वैद्यकिय अधिकारी 21, आर बी एस के डॉक्टर 70 समुदाय वैदयकीय अधिकारी 110,

औषध निर्माण अधिकारी 33, आरोग्य सहाय्यक पुरुष 75, आरोग्य सहाय्यीका 7, आरोग्य सेवक 153, आरोग्य सेविका 94, एम. टी. एस / एस.टी एल एस 17, वाहन चालक 37 व शिपाई 31 असे एकूण 666 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वरील कर्मचाऱ्यापैकी 17 आरोग्य दुत यांची मार्गावर आरोग्य सेवा देणे करीता नियुक्ती करण्यात आली आहे.

पाणी शुद्धीकरसाठी स्वतंत्र पथके

खंडाळा तालुक्यात 5 व फलटण तालुक्यात 29 असे एकूण 34 पथके पाणी शुद्धीकरणासाठी तयार करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील टँकर फिलींग पॉईट पथके खंडाळा तालुक्यात 14 व फलटण तालुक्यात 21 असे एकूण 35 पथके पालखी मार्गावरील फिरती वैद्यकिय पथके (आरोग्य दुत पाडेगाव ते खरड संपूर्ण मार्गावर) 17 दुत पालखी मार्गावरील वैद्यकिय पथके खंडाळा -8 व फलटण -14, एकूण 22 पथके आहेत.

24 तास नियंत्रण पथके

पालखी मार्गावरील आरोग्य व्यवस्थापनांतर्गत वैद्यकिय संस्था शासकीय 12 व खासगी 151 एकूण 163, आंतररुग्ण (खाटांची संख्या) शासकिय 140 व खाजगी 900 एकूण 1040. उपलब्ध विविक्षीत कक्ष प्राथमिक शाळा 61 व समाजमंदीर 11 एकूण 72 अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय 24 तास नियंत्रण पथके तैनात ठेवण्यात येणार आहे.