जिल्हा परिषदेचे अधिकारी आजपासून 2 दिवसाच्या कांदाटी खोऱ्याच्या दौऱ्यावर; 56 गावांचा घेणार आढावा

0
413
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारपासून दोन दिवस कांदाटी खोरे अभ्यास दौरा सुरु यामध्ये १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ५६ गावांत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा, पाहणी करण्यात येणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाबळेश्वर तालुक्यात असणारे कांदाटी खोरे हे जैवविविधतेने संपन्न आहे. या कांदाटी खोरे भागातील ५६ गावांत शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. याची पाहणी हे अधिकारी करणार आहेत.

या अधिकाऱ्यांचा हा अभयस दौरा आजपासून सुरू झाला असून उद्या दि. १ मार्च रोजी हा दौरा संपणार आहे. या दौऱ्यात तलंगा गट वाटप, घरकुलांचे भूमिपूजन, कामांची पाहणी, शाळा खोल्या पाहणी, आरोग्य केंद्रांना भेट, जलजीवन मिशन काम. पाहणी, शाळा, अंगणवाड्यांना भेट, मधाचे गाव प्रकल्पास भेट आणि चर्चा, तसेच महिला बचत गटांचा मेळावाही घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या या अभ्यास दौऱ्याचे पूर्ण नियोजन झालेले आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी दोन दिवस कांदाटी भागाच्या दौऱ्यावर आहेत.