महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत, त्या महाविद्यालयांनी सदर अर्ज महाविद्यालयस्तरावर न ठेवता सहायक आयुक्त, समाजकल्याण, साताराकार्यालयास 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/ शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छ. शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. ११/१०/२०२३ पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय/ महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी.

तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ मधील शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत. तसेच सदरचे अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डूडी यांनी केले आहे.