कराडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद?; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सध्या पशुपालक शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. कारण गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर या शेजारील जिल्हयात लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या रोगाच्या प्रादुर्भाव सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी असल्याचे आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन
गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

सातारा जिल्हयातील कराड येथे आठवड्यातील दर गुरुवारी मोठा बाजार भरतो. यामध्ये कराड तालुक्यासह लगतच्या पाटण, सातारा, माण, खटाव व सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव व अन्य तालुके आणि लगतच्या कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे जनावरे खरेदी विक्रीसाठी कराडच्या आठवडी बाजारात दाखल होत असतात. त्यामुळे बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. यामध्ये इतर पाळीव
जनावरांसह गोवर्गीय जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-
विक्री होत असते. मात्र, लंपिमुळे आता बाजारात जनावरांच्या खरेदी – विक्री मंदावली आहे.

तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू

दरम्यान, गतवर्षीही लम्पी या जनावरांमधील चर्म रोगाच्या
प्रदुर्भावामुळे कराड तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामधून आता कुठे शेतकरी वर्ग सावरताना दिसत होते. परंतु, पुन्हा यावर्षी पाळीव जनावरांमध्ये पुन्हा लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होत
असल्याचे निदर्शनास आले असून, या रोगाने कराड
तालुक्यातील दोन जनावरांचा मृत्यूही झाला आहे.