सातारा प्रतिनिधी । राज्यातील विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो. उष्णतेच्या लाटामुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता, जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाय योजना व मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या सूचनांची विविध विभागांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नगर पालिका, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक आणि माध्यमिक), कामगार विभाग, परिवहन विभाग, वन विभाग, ऊर्जा विभाग, पोलीस विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आदी विभागांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक सर्वसमावेशक “उष्णतेची लाट कृती आराखडा”, व मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि घटना प्रतिसाद प्रणाली (IRS) विकसित करावी. ज्यामध्ये लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध जिल्हा भागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात जिल्हा स्तरावर उष्मालाट नोडल अधिकारी नियुक्त करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
नगरपालिकेने करावयाची कार्यवाही
बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टँड, टॅक्सी स्टॅड, रिक्षा स्टँड इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी तसेच सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित घ्यावयाची काळजी, संदर्भात पोस्टर्स/बॅनर्स लावावेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात, सर्व उद्याने दुपारी १२ ते दुपारी ४ वेळेत खुली ठेवावीत.
आरोग्य विभाग
उष्णतेच्या लाटेशी संबंधित आजार निरीक्षण करणेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करावे, प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात माहिती फलक लावावेत, उष्माघाताच्या रुग्णासाठी आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र वैद्यकीय वॉर्डाची व्यवस्था करावी, उष्माघाताच्या रूग्णांच्या उपचारासाठी जलद प्रतिसाद टीम तयार करावी, स्थानिक रुग्णालयांमध्ये ORS पावडरसह आवश्यक वैद्यकीय सुविधा यांचा साठा पुरेसा ठेवावा.
पंचायत विभाग
मनरेगा कामगारांच्या कामाचे तासांचे नियोजन करावे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवावी, उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृतीसाठी ग्रामसभेचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करण्यात यावा.
शिक्षण विभाग (प्राथमिक आणि माध्यमिक)
हवामान खात्याकडून आलेल्या चेतावणींनुसार शाळा/महाविद्यालयांचा वेळा नियोजन करावे, प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शाळेच्या वेळांमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुट्टी देण्यात याव्या, उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात, दुपारच्या सत्रात मैदानावरील खेळांचे नियोजन करू नये, परीक्षा सकाळच्या सत्रातच घेतल्या जाव्यात, पंखे सुस्थितीत राहतील याची खात्री करावी, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना सरबत, ताक आणि ORS पॅकेट द्यावे.
कामगार विभाग
कामगारांवर उष्णतेच्या लहरींचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळोवेळी सूचना द्याव्या, कामगारांचे कामाच्या तासांचे नियोजन करावे, कामगारांना उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण द्यावे.
परिवहन विभाग
सार्वजनिक वाहतुकीच्या प्रतीक्षा क्षेत्रावर सावली, पाणी आणि पंखे याची सोय करावी, प्रवाशांना माहितीपत्रक वितरित करावे, दुरचित्रफीत, IEC प्रसारित करण्यासाठी बसस्थानके इत्यादीचा सार्वजनिक संबोधन प्रणालीचा वापर करावा, उन्हाळ्यात सर्व बसेसमध्ये प्रथमोपचार किट असल्याची खात्री करावी, बस स्थानकावर पाण्याची सोय, पंखे सुस्थितीत असावे.
वन विभाग
वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पुरेसे वृक्षारोपण आणि पाण्याचा पुरवठा असावा, आग रोखण्यासाठी वनक्षेत्रांचे निरीक्षण करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, कुपनलिका आणि तलावांची तातडीने दुरुस्ती करावी, उन्हाळी हंगामापूर्वी सर्व प्रकारच्या जलस्रोतांची तपासणी आणि देखभाल करावी, सकाळी किंवा संध्याकाळी पाणी पुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करावे,
सार्वजनिक बांधकाम विभाग
सरकारी इमारती आणि संस्थांमध्ये कूल रूफ पेंटच्या वापराबद्दल प्रचार करावा, बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी निवारा आणि प्रथमोपचार किट उपलब्ध करावे.
ऊर्जा विभाग
उष्णतेच्या लाटांमध्ये वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी सर्व उपाय योजना करण्यात याव्या, वीज बिलांवर उष्णता लहरीशी संबंधित IEC सामग्री प्रसारित करावी किंवा वीज बिलांसह IEC-संबंधित माहितीपत्रक वितरित करावे.
कृषी विभाग
उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती प्रसारित करण्यासाठी “शेतकरी मित्र” यांचा वापर करावा, शेत तलावांच्या देखभालीसाठी किंवा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे, शेतीवर आधारित उपजीविकेसाठी पाण्याची उपलब्धते संदर्भात नियोजन करावे.
पोलीस विभाग
पोलिसांसाठी सिग्नलवर निवारा किंवा बूथ उभारणी करावी, पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक बूथवर प्रथमोपचार किट उपलब्ध करावे, प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण आयोजित करावे, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मुबलक पाण्याची व्यवस्थासाठी परवानगी द्यावी,