मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी डुडींनी दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र राज्यासाठी यांनी दि.१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. सातारा जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवकांची संख्या मोठी असून यातील बहुतांश मतदारांची नावे मतदार यादीत आहेत. नव युवकांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्हयातील या कार्यक्रमातंर्गत दि.२५ जून २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेव्दारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधीत कुटूंब प्रमुखाकडून करुन घेणार आहेत. मतदान यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीला मतदान करावयाचे असेल, तर सर्व पात्र मतदार यांनी मतदार यादीत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने मतदार यादी पुनरिक्षण मोहीम हाती घेतली आहे.

दि. 25 जूनपासून ही मोहिम सुरु झालेली आहे. त्यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव पत्ता बदल, दुबार आणि मयत नाव वगळणे आदी कामे करण्यात येणार आहे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी 25 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, येत्या तीन ते चार महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवकांची संख्या मोठी असून यातील बहुतांश मतदारांची नावे मतदार यादीत आहेत.

घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी केली जाणार

जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, तसेच जनजागृती केली जाणार आहे. मतदार यादी अधिक अचूक करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार यंदा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (बीएलए) यांच्यासोबत मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी केली जाणार आहे. बीएलओ व बीएलए एकत्रित फिरले तर मयत व नोंदणी शिल्लक असणाऱ्या मतदारांची नांवे समजण्यास मदत होईल.

ऑनलाईन अर्ज करता येणार

1 जुलै २०२४ रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. मतदार यादीत नाव आहे किंवा कसे याबाबत www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल अॅपवर संपूर्ण नांव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर माहिती समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक ०६ भरावा, नोंदीत दुरुस्त्या, पत्ता बदलण्यासाठी ८. तर नाव वगळण्यासाठी ०७ क्रमांकाचा अर्ज भरावा. तसेच जवळील मतदान केंद्रांवर बीएलओ यांच्याकडे सुद्धा अर्ज दाखल करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली, तसेच voters.ecl.yov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

‘या’ दिवशी करता येणार हरकती दाखल

मतदार यादीत नाव नोंदविणे, पत्ता बदल करणे, मयत नाव वगळणे आदीसाठी 24 जुलै२०२४ पर्यंत मुदत आहे. प्रारूप मतदार यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत दि. 9 ऑगस्ट २०२४ अंतिम मतदार यादी दि. 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.