सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी खरीप हंगामासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरु केली आहे. या योजनेत ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. सातारा जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी नुकताच साताऱ्यात माध्यमांशी संवाद असधला. यावेळी त्या म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात ५८ टक्के पेरणी झाली असून त्याचे क्षेत्र १ लाख ६७ हजार ३७९ हेक्टर भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या पिकांसाठीही पिक विमा योजना लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त १ रूपया विमा हप्ता भरायचा असून उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. शेतकऱ्यांसोबत कुळांनाही या योजनेत सहभागी होणार येणार आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा व खाते उतारा, सातबारवर पिकाची नोंद नसल्यास पीक पेऱ्याचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक, फोटो ओळखपत्र (आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड) यांची आवश्यकता आहे. विमा हप्ता राष्ट्रीयीकृत बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक, सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याकडे भरावा. शेतीचे नुकसान झाल्यास बँक किंवा विमा कंपनीस ७२ तासात माहिती देणे आवश्यक आहे.
1 रुपयांत पिक विमा घेण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंतच मुदत; जिल्हा कृषी अधीक्षक फरांदेंची महत्वाची माहिती pic.twitter.com/7gbV1TJ17Q
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 23, 2023
पीक परेणी किंवा लावणीपूर्व नुकसान भरपाई, हंगामामधील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नैसर्गिक कारणांमुळे होणारे नुकसान यासाठी मदत मिळते. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.