कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले जाते. कोयना वसाहत, ता. कराड येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे 128 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या सुरक्षा संच पेटीचे वितरण करण्यात आले.
यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की देश उभारणीत बांधकाम कामगारांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात रस्ते, प्रशासकीय कार्यालये आदींचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु आहे. तसेच वाढत्या नागरीकरणामुळेदेखील शहरी व ग्रामीण भागात सातत्याने बांधकामे सुरु असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना सुरक्षितता लाभावी, यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप सुरु केले आहे. या सुरक्षा साधनांचा कामगारांना मोठा लाभ होणार आहे.
यावेळी कोयना वसाहतचे उपसरपंच उमेश कुलकर्णी, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सारिका गावडे, ग्रामपंचायत सदस्य विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, महेश कुलकर्णी, बिपीन मिश्रा, उमेश गुरव, राहुल जाधव, राहुल पाटील यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.