कराड तालुक्यातील 1589 लाभार्थी दिव्यांगांना साहित्य वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निर्गम (अलिमको) यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारी साहाय्यभूत साधने दिली जातात. या संस्थेमार्फत कराड तालुक्यातील दिव्यांगांचे शिबिर डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आले होते. या शिबिरात साहित्यासाठी दिव्यांगांची निवड करण्यात आलेली होती. यातील 1589 दिव्यांगांना कालपासून साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली. त्यापैकी 970 दिव्यांगांना काल साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात या साहित्य वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. शिबिरात निवड झालेल्या दिव्यांगांचे साहित्य अलिमकोकडून कराड येथे आणण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहायक गटविकास अधिकारी विजय मोट विभुते यांची प्रमुख उपस्थिती होते.

या मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटपास शुभारंभ करण्यात आला. कराड तालुक्यातील 1589 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पहिल्या दिवशी लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. पंचायत समितीने वितरण व्यवस्था नीट होण्यासाठी योग्य नियोजन केले होतें. आज देखील साहित्याचे वितरण केले जाणार आहे.

1589 लाभार्थ्यांसाठी 2400 कीट : प्रताप पाटील

कराड तालुक्यात 2021 साली जेव्हा सर्वप्रथम केंद्र शासनाच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निर्गम (अलिमको) या संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती.त्यामधून 1589 लाभार्थ्याची निवड करण्यात आली. त्यांना कालपासून साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आले आहे. कराड पंचायत समिती आणि शासन दिव्यांग व्यक्तींच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याचे कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.