कराड प्रतिनिधी | कराड रोटरी क्लबच्या वतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल यांच्या संकल्पनेतून डिस्ट्रिक्ट ग्रँट प्रकल्प अंतर्गत गरजू महिलांना व्यावसायिक आटाचक्कीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती RTO चैतन्य कणसे यांची होती.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष बद्रीनाथ धस्के, सेक्रेटरी शिवराज माने,परिवर्तन स्पेशल प्रोजेक्टचे चेअरमन अशोक इंगळे, इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या अध्यक्षा तरुणा मोहीरे, अपूर्वा पाटणकर, शिवाजीराव डुबल, हजारमाची च्या माजी सरपंच विद्या घबाडे, किरण जाधव, गजानन माने, रामचंद्र लाखोले,राजीव खलीपे, अभिजीत गोडसे,चंद्रशेखर पाटील, आनंदा थोरात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी कराड येथील संकल्प रमेश शहा आणि सौ. सारिका संकल्प शहा यांच्या हस्ते 3 महिलांना व्यावसायिक आटाचक्कीचे वितरण करण्यात आले. तसेच समाजातील एकल आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी 2 एचपी क्षमतेच्या ताशी 25 किलो धान्य आणि मसाला बनवता येईल अशा कमर्शियल आटाचक्कीचे यावेळी वितरण करण्यात आले.
यावेळी श्रीमती बिजली सचिन देशमुख (राजमाची) श्रीमती उर्मिला विजय महापुरे (वहागाव) आणि वंदना तानाजी सकट (हजारमाची) यांना या आटा चक्की देण्यात आल्या. गरजू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपली उपजीविका चालवता यावी आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी या करीता उपक्रम राबवण्यात आला.