सातारा प्रतिनिधी । सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार महाबळेश्वर तालुक्यामध्ये दुधगाव व कुंभरोशी या ठिकाणी महसुल विभाग १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांर्तगत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाबळेश्वर मंडळातील शेतकरी व स्थानिक रहिवासी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यावेळी वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये महसूल विभागामार्फत मौजे दुधगाव, चतुरबेट, झांझवड, गोरोशी, देवळी, कळमगांव, कुंभरोशी, दरे, जावली, हरोशी, प्रतापगड, पारपार, दुधोशी, सोंडपार, कूमठे, पेठपार, बिरमणी, खरोशी, शिरनार, दाभे-दाभेकर, दाभेमोहन, कासरुंड, हातलोट, घोणसपूर इत्यादी गावामधील स्थानिक शेतकरी व रहिवासी यांना महसूली सेवा दिल्या.
यावेळी ॲग्रीस्टॅग, लक्ष्मीमुक्ती योजना, संजय गाधी योजना व पी.एम. किसान योजना या बाबतची नागरिकांना माहिती देणेत आली. शिबीराच्या ठिकाणी सेतुमार्फत प्रतिज्ञापत्र जागेवरच सुविधा देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व नायब तहसिलदार, सहायक महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, पोलिस पाटील यांनी कामकाज पाहिले.
‘शासन आपल्या दारी’ तून ‘ही’ कामे पूर्ण
या कामाचे वारस नोंदी : २५,
लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत अर्ज : ०३,
एकूण फेरफार नोंदी : २८,
तुकडा नोंद कमी करणेची ७/१२ संख्या : १४७,
अॅग्रीस्टॅग शेतकरी नोंदणी : ३२,
दुबार शिधापत्रिका वाटप : २०९,
७/१२,८अ, फेरफार उतारे : एकुण १०७,
मृत्युचे दाखले : १०७