विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांनो मोठी जबाबदारी पार पाडा : धैर्यशील कदम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भाजप युवा मोर्चा रहिमतपूर मंडलच्या विविध पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांना मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. त्यामुळे सर्व युवकांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी केले.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भाजपा रहिमतपुर मंडल अध्यक्ष भीमरावकाका पाटील, रहिमतपुर मंडल भाजयुमो अध्यक्ष श्रीकांत आप्पा पिसाळ, ज्ञानेश्वर पवार, तुषार माने, बाळू आप्पा थोरात, निलेश माने, अविनाश चव्हाण यां यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा कराड उत्तर परिवर्तन यात्रेला सर्वसामान्य जनतेचा, महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. भाजप कराड उत्तरच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेने गट दोन दिवसात कोरीवळे, साबळेवाडी, अंधारवाडी, शिवडे, हनुमानवाडी, वराडे, तासवडे, बेलवडे ह, येथे ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी, महिलांनी परिवर्तन यात्रेचे जोरदार स्वागत केले. महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, तुकाईवाडीत ग्रामपंचायत इमारत बांधणे या विकास कामाचा भूमिपूजन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी कराड उत्तर भाजपचे नेते मनोजदादा घोरपडे (Manojdada Ghorpade), विरोधी पक्षनेते निलेश माने, सरपंच सुमित्रा माने, उपसरपंच सविता यादव, संभाजी देशमुख, राजश्री सावंत, सुषमा शेडगे, समाधान जाधव, रिंकू शेळके, राजेंद्र कदम यांच्यासह तुकाईवाडी गावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

गायकवाडवाडीत ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे भूमिपूजन

कराड तालुकयातील गायकवाडवाडी येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे या विकास कामाचा भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कराड उत्तर भाजपचे नेते मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, सरपंच रेशमा पवार, सोनाली पवार, प्रमोद जाधव, विठ्ठल गायकवाड, संजय पवार, मनोज पवार, संदीप गायकवाड, आनंदराव पवार, मारुती घोलप यांच्यासह गायकवाडवाडी गावचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.