सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रति ब्रास ६०० रुपये इतक्या कमी दराने सर्वसामान्यांना वाळू मिळत आहे. दरम्यान, आज अखेर ३५९ नागरिकांनी महाखनिज नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतलेला आहे. वाई व कराड येथील एकुण वाळू डेपोंमध्ये एकूण २ हजार ७७८ ब्रास वाळूची नोंदणी झालेली असून त्यापैकी १ हजार ९७७ ब्रास वाळूचे वितरण केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये शासनामार्फत वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री साठवणूक तसेच विक्री, व्यवस्थापन याबाबतचे सर्वकष धोरण राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीने ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून वाई तालुक्यातील आसले, एकसर, पाचवड आणि वाई हे चार वाळू डेपो आणि कराड तालुक्यातील सुपने, इंदोली, घारेवाडी आणि खालकरवाडी हे चार वाळू डेपो अशा एकूण ८ वाळू डेपोंसाठी मंजूरी दिलेली आहे. या वाळूडेपोंमध्ये १४१३ ब्रास वाळूसाठा उपलब्ध असुन नारिकांना महाखनिज प्रणालीवर वाळू मागणीबाबत
नोंदणी करुन वाळू प्राप्त करुन घेता येईल.
ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदनों णी झाल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे. वाळू डेपोपासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी ग्राहकाची असून वाळूची वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था डेपोच्या ठिकाणी उपलब्ध केली आहे. सर्वसामान्यांनी शासनाच्या वाळू धोरण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आवाहन केले आहे. तसेच अवैध मार्गाने वाळू प्राप्त करुन घेऊ नये. वाळू नोंदनों णी संदर्भात काही अडचणी आल्यास संबंधित तहसिल कार्यालय किंवा गौणखनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.