सुपनेमधील टेंभू प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत जमीन मोबदला प्रक्रियेविषयी चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व प्रांताधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्याच्या इशाऱ्यानंतर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुपने येथे जाऊन बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन जमीन मोबदला मिळण्याच्या प्रक्रियेविषयी चर्चा केली.

सुपने व पश्चिम सुपने परिसरातील टेंभू प्रकल्पबाधित जमिनीचे सर्वेक्षण होऊन तेरा वर्षे उलटून गेली. मात्र, अद्याप या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. शासनाने खासगी वाटाघाटीने थेट खरेदींतर्गत भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी ऑगस्ट २०२० व सप्टेंबर २०२१ ला रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली. बाधित शेतकऱ्यांचे गट क्रमांक प्रसिद्ध करून संबंधित शेतकऱ्यांची संमतीपत्र व फेरफार उतारे मागवले. सर्व शेतकऱ्यांनी शासनाला आपले प्रस्ताव दिले. मात्र, चार वर्षे उलटून गेली तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.

त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी येत्या पंधरा दिवसांत मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत याबाबतचे निवेदन टेंभू प्रकल्पाच्या कार्यालयास प्रांताधिकाऱ्यांना दिले. तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या या निवेदनाची दखल घेत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांसमक्ष तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.