कराड प्रतिनिधी । जमिनीवर बँकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही महिलेला दिली होती. याप्रकरणी सुनंदा जालिंदर हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शंकर कारंडे (रा. उंब्रज, ता. कराड), रामकृष्ण बाबुराव देसाई (रा. आणे, ता. कराड), विमल मधुकर सुपनेकर (रा. हिंगनोळे, ता. कराड) यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याची माहिती मिळताच विमल सुपनेकर यांनी उंब्रजमधील घडलेल्या घटनेत फिर्यादीसह एका संशयितांकडून आपली फसवणूक करण्यात आली असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
उंब्रजमधील ‘त्या’ घटनेत फिर्यादीसह एका संशयितांकडून आपली फसवणूक ; ‘त्या’ महिलेन केला खुलासा pic.twitter.com/uvdXecvOUr
— santosh gurav (@santosh29590931) February 14, 2024
याबाबत सुपनेकर यांनी लेखी खुलासाही केला आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, मी हिंगनोळे ता. कराड येथील रहिवाशी असून उंब्रज पोलीस स्टेशनला सौ. सुनंदा हजारे यांचे फिर्यादी वरून माझे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. मी सुनंदा हजारे हिची फसवणूक केलेली नाही. या उलट या गुन्हयातील रामकृष्ण बाबुराव देसाई रा. आणे ता. कराड याने मला ट्रॅक्टर व ट्रॉली व मोटार सायकल विकत देतो असे सांगून माझेकडून ९ लाख रुपये घेतलेले आहेत. सदरची रक्कम मी माझे व कुटूंबातील सोन्याचे दागिने ७ तोळे गहाण ठेवून व घरातील शिल्लक रकमेतून दिलेले आहेत. अशा प्रकारे रामकृष्ण बाबुराव देसाई याने माझी आर्थिक फरावणूक केलेली आहे.
अशा प्रकारे सुनंदा हजारे व रामकृष्ण देसाई यांनी संगनमताने फिर्याद दाखल केलेली असून त्यामुळे माझी बदनामी झालेली आहे. त्यामुळे माझी मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांचे विरूध्द कारवाई न झालेस दि. २६ रोजी मी उंब्रज पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार आहे. सुनंदा हजारे हिने कोणाशी कोणता व्यवहार केला याची मला काहीही कल्पना नाही. सुनंदा हजारे हिने माझी बदनामी केली आहे. मला न्याय मिळावा,अशी मी मागणी करत असल्याचे लेखी पत्रात सुपनेकर यांनी म्हंटले आहे.