शरद पवारांनी बोलावलेल्या ‘त्या’ बैठकीबाबत वळसे पाटलांनी साताऱ्यात दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता फूट पडली असली तरी खासदार शरद पवारांनी बोलावलेल्या अध्यक्षपदाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आणि पवार साहेब अजितदादांना काय म्हणाले? यासह अनेक प्रश्न अजूनही जनतेत सुरु आहरेत. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी नेमकं काय घडलं? पवार साहेबांच्या मनात काय होते? यासह बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजितदादांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष करण्यासाठीच खा. शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र, अजित पवार यांनीच नकार दिल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला होता. याबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मौन बाळगत त्या बैठकीला उपस्थितच नसल्याचे सांगितले.

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या विविध बैठका व कार्यक्रमाच्या निमित्ताने वळसे पाटील सातारला आज आले होते. त्यावेळी केबीपी कॉलेज येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री वळसे पाटील म्हणाले की, संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत. ते वारंवार वेगवेगळी विधान करत असतात, सल्ले देत असतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्याच जागी ठेऊया, असा सल्ला दिला.

संजोग यांना या पूर्वी संधी दिली होती. त्याठिकाणी आता दुसरे नेतृत्व तयार झाले आहे. कदाचित आपलं नाव यादीत येणार नाही हे कळल्यामुळंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा. जिगाव प्रकल्पासाठी पाईप खरेदी करण्याची गरज नसतांना अजित पवार पाटबंधारे मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांची पाईप खरेदी केली, निवडणूकीपुर्वी ३३०० कोटीचं टेंडर ठेकेदारांना देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत अजित पवार हेच योग्य उत्तर देतील, मी उत्तर देऊ शकत नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.