1 हजार 950 किमी सायकल प्रवास करत ‘दिलीप’ने दिला समाजाला अनोखा संदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाघोशी या छोट्याशा गावातील तरुण दिलीप आप्पा धायगुडे या युवकाने १ हजार ९५० किमी सायकल प्रवास करतवाघोशी ते केदारनाथ असा प्रवास नुकताच पूर्ण केला आहे. दिलीपने वाघोशी ते केदारनाथ १९५० किमी प्रवास १० मे रोजी सुरू केला होता. आणि तो ५ जून रोजी केदारनाथ येथे दाखल झाला. प्रवासावेळी झाडांचे महत्त्व सांगत “झाडे लावा व ती जगवा”, असा अनोखा संदेश त्याने दिला.

दिलीपला या प्रवासाला एकूण २७ दिवस लागले असून हा प्रवास त्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश,व उत्तराखंड या ५ राज्यांमधून पूर्ण केला. ऊन, वारा, पावसात त्याने सायकल प्रवास करत समाजाला सायकल प्रवास करण्याचा संदेश दिला आहे.

या सायकल प्रवासामुळे दिलीपने आई, वडील त्याच्या गावाबरोबर तालुका व जिल्हाचे नाव उज्ज्वल केले. या प्रवासासाठी इंडियन ग्रुप ऑफ वाघोशी यांनी दिलीपला पाठबळ दिले होते.