धोम-बलकवडी कालव्याचे आवर्तन झाले बंद; मुळीकवाडी धरण काठावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ऑगस्ट महिन्यात धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटल्याने नालाबांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरले; पण चार गावांना पाणीपुरवठा करणारे व हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारे मुळीकवाडी धरण धोम -बलकवडीच्या पाण्याने काठावर भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. तांबवे, हणमंतवाडी, हिंगणगाव, मुळीकवाडी ही दुष्काळी भागातीत प्रमुख धरणे आहेत.

सर्व धरणे नैसर्गिक सर्व धरणे नैसर्गिक पाण्याने भरत होती; परंतु पर्जन्यमान कमी झाल्याने कोरडी पडू लागली. त्यानंतर धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे ओढ्याला सोडून कालव्याच्या खालच्या बाजूची धरणे कालव्याच्या पाण्याने भरू लागली; पण धरणे भरण्यास जादा वेळ लागतो म्हणून धरणात पाणी सोडण्याचे प्रमाण कमी केले. गत दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती धरणातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे विहिरी आटल्या. त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर होऊन पाणीटंचाई भासू लागली.

शासनाने गावोगावी टँकर सुरू केले. जून महिन्यात पावसाने हजेरी लावली तर जुलै महिन्यात आदर्की खुर्द, वाठार गाव परिसरात मोठा पाऊस झाल्याने आदर्की, हिंगणगाव ओढ्याला पूर आल्यामुळे बुरसुंडी धरण ७० टक्के भरले तर बिबी परिसरात पर्जन्यमान कमी झाले. ऑगस्टमध्ये धोम – बलकवडी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटले. ऑगस्ट महिन्यात शेवटचा आठवडा व सप्टेंबरचा पहिला आठवड्यादरम्यान आदर्की परिसरात जोरदार पाऊस झाला. ओढ्याला पूर आल्याने बुरसुंडी धरण भरले तर बिबी परिसरात पाऊस कमी झाला. त्यामुळे धोम-बलकवडी कालव्याद्वारे पाणी बिबी, नांदल ओढ्याला सोडले, त्याने मुळीकवाडी धरणात पाणीसाठा झाला; पण कालव्याचे पाणी बंद झाल्याने सांडव्याच्या भिंतीला पाणी लागले.