सातारा प्रतिनिधी | अवघ्या १२ वर्षांच्या सातारा जिल्ह्यातील धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर नुकतेच सर केले. आई-वडिल आणि पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.
आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच मानले जाते. ट्रेकिंग,गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते.तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर करावे लागते.
उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी आणि ऑक्सिजन कमी शिवाय रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर चढावे लागते. वयाच्या सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागलेल्या सातारा येथील धैर्या कुलकर्णी हिने किली मंजारो शिखर पार केले.
किलीमंजारो शिखर म्हणजे मृत ज्वालामुखीच आणि धैर्याने ५ हजार ६५० मीटर उंचीवर किलीमंजारो शिखर पार केले. दि.२५ ते ३० ऑक्टोबर या सहा दिवसात धैर्याने ही कामगिरी पार पाडली.साताऱ्यात परतल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.