कराड प्रतिनिधी | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने चंद्रशेखर राव पंढरपूर मध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता भक्तीभावाने कोणी पंढरपूरला आल्यास स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, पंढरपूरला कोणीही आल्यास त्यांचे स्वागत आहे. फक्त राजकारण करण्यासाठी कुणी येऊ नये. भक्ती भावाने यावे. भक्तीभावाने जर कुणी येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत.
दरम्यान, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उरमोडी, जिहे कठापुर आणि टेंभू या तिन्ही योजनाच्या संदर्भात आढावा घेतला आहे. आणि यातील काही महत्वाचे प्रकल्प आहे त्यांना जी शासकीय मान्यता बाकी आहे त्यांना महिनाभरात निधी व शासकीय मान्यता देऊन तेथील उरलेल्या कामांना गती देत आहोत. जेणेकरून हे पाणी दुष्काळी भागांना मिळाले पाहिजे. अस फडणवीस म्हणाले.
एमआयडीसीतील कामा संदर्भात जो मुंबई – बेंगलोरच्या कॉरिडॉर आहे. त्याच्या धर्तीवर म्हसवडला जी एम आय डी सी तयार करायची आहे. यासह इतर ठिकाणी एम आय डी सी मधील जे प्रश्न आहेत, त्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली आहे. जवळ जवळ केंद्र सरकारने या एम आय डी सीतील योजनांसाठी मान्यता दिली असल्याने आणि आता जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू करत आहोत अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.