सातारा जिल्ह्यातील 4 दुष्काळी तालुक्यातील पाणी प्रश्नी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाबाबत काल महत्वाची बैठक सुपर पडली. बैठकीत फेरजुळ नियोजनास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली. या महत्वाच्या निर्णयामुळे सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित आहेत अशा भागांना याचा मोठा फायदा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारने मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उलपब्ध होणार आहे. 2 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे 4 तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा आहे समावेश

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार 2 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे 4 तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे. यामध्ये सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे.