‘गोरेंविरोधात कट रचणारे शरद पवार गटाच्या संपर्कात’; CM फडणवीसांनी सभागृहात घेतलं प्रभाकर देशमुखांचं नाव

0
663
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात आज मोठा गौप्यस्फोट केला. मंत्री गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेची चौकशी झाली व तिने खंडणी मागीतल्याने तिला अटक झाली. या आरोप प्रकरणात महिला, कथित पत्रकार व अनिल सुभेदारयांना अटक झाली आहे. ही तिन्ही लोक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होती. हे मी पुराव्यानिशी सांगतो. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी १०० वेळा बोलले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे विधानसभेचे अहिवाशां मुंबईत सुरु असून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्तीम प्रस्ताव सर केला. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या महिलेच्या आरोपांच्या प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कोणाला जीवनातून उठवायचे राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. जयकुमार गोरे यांच्यासंदर्भातील केस २०१६ मध्ये दाखल झाली आणि ती २०१९ ला संपली. तेव्हा ते आमच्या सोबतही नव्हते. त्यानंतर हे प्रकरण अचानक उकरून काढण्यात आले. मी त्यांच्या हिम्मतीची दाद देतो.

कारण अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती आपण दोषी आहोत की नाही याचा विचार न करता घरच्यांचा अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्यासाठी प्रयत्न करतो. पण त्यांच्याकडे लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की. मी या प्रकरणात दोषी नाही, कोर्टाने मला सोडलं आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी सगळं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. त्यानंतर सापळा रचून पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता.”

मंत्री गोरेंच्या विरोधात कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले

मंत्री जयकुमार गोरेंसंदर्भात तक्रारी करण्यात आल्या. आरोप करणारी महिला, तुषार खरात नावाचा कथित युट्युबवर आणि काही लोकांचं नेक्सस यामध्ये पाहायला मिळालं. पहिली तक्रार जयकुमार गोरे यांनी केली होती. दुसरी तक्रार विराज शिंदे यांनी केली. तिसरी तक्रार उमेश मोहिते यांनी केली. या प्रकरणात जी महिला आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. त्या विरोधात ही तक्रार होती. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. यामध्ये ती महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मिळून जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत.

प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी 100 वेळा बोलले

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. हे मी पुराव्यानिशी सांगतो. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी १०० वेळा बोलले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती आली.